You are currently viewing ग्रामस्थाला हुल दिल्याने डंपर चालका विरोधात नागरिक संतप्त

ग्रामस्थाला हुल दिल्याने डंपर चालका विरोधात नागरिक संतप्त

कुंभारमाठ ग्रामस्थांनी अडविले डंपर

मालवण

मालवण कसाल हमरस्त्यावर कुंभारमाठ येथे एका डंपर चालकाने ग्रामस्थाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून संतप्त बनलेल्या कुंभारमाठ ग्रामस्थांनी आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा डंपर अडवले. यावेळी ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन काही डंपर चालकांनी तिथून पळ काढला . ही घटना समजताच मालवण पोलिसांनी धाव घेत ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगाने डंपर चालविल्याप्रकरणी ग्रामस्थांनी कारवाई करण्याची मागणी लावून धरल्याने पोलिसांनी ग्रामस्थांच्या अंगावर गेलेला डंपर ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी तो पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तर इतर डंपरवर वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 7 =