You are currently viewing करुळ घाटात ट्रक आदळला कठड्यावर

करुळ घाटात ट्रक आदळला कठड्यावर

करुळ घाटात ट्रक आदळला कठड्यावर

वैभववाडी
करुळ घाटात ट्रक कठड्याला आदळला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रक चालक सुनील गेमू जाधव वय ३८ रा. आनंदनगर कासार्डे हे कोल्हापूरहून वैभववाडीच्या दिशेने ट्रक (नं. एम एच ०७ एजे – ०८८४) घेऊन जात होते. करुळ घाटात ट्रक आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. व ट्रक दरीकडील कठड्याला आदळला. ट्रक ची पुढील चाकं कठड्यावर होती. खोल दरीत ट्रक जाता जाता बचावला. अपघात ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा