मालवण
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे संचालक आणि महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक निशाकांत पराडकर, उत्तरेश्वर लाड, शुभम मुळीक, शशांक घुर्ये, सुजन परब, चंद्रकांत साळवे,कमलेश गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विष्णू कोरगावकर, निशाकांत पराडकर आणि कमलेश गोसावी यांनी आपल्या मनोगतातून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर
यावेळी मुलांच्या व मुलींच्या विविध गटांमध्ये स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- १४ वर्षांखालील मुले- विजेता जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल मालवण, उपविजेता सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी, तृतीय यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी. १४ वर्षांखालील मुली- विजेता जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण. १७ वर्षांखालील मुले- विजेता रोझरी इंग्लिश स्कूल मालवण, उपविजेता सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी, तृतीय सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश माध्यम स्कूल वेंगुर्ला. १७ वर्षांखालील मुली -विजेता अ.शी.दे. टोपीवाला हायस्कूल मालवण, उपविजेता भंडारी एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल मालवण, तृतीय सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी. १९ वर्षांखालील मुले- विजेता श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, उपविजेता राणी पार्वतीदेवी महाविद्यालय सावंतवाडी, तृतीय यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी. १९ वर्षांखालील मुली- विजेता डॉन बॉस्को अँड ज्युनियर कॉलेज ओरोस.
या स्पर्धेसाठी पंच व व्यवस्थापनाचे काम उत्तरेश्वर लाड,विष्णू कोरगावकर, शुभम मुळीक,चंद्रकांत साळवे, सुजन परब व डीडी जाधव यांनी पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांना जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक निशाकांत पराडकर यांनी विभाग स्तरावर देदीप्यमान कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल उत्तरेश्वर लाड यांनी सर्वांचे आभार मानले.