सावंतवाडी
येथील भारतीय जनता पार्टीच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उद्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथील रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स मध्ये होणार आहे.
यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, शहर मंडल कार्यकारीणी पदाधिकारी व सदस्य, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष तसेच अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन महेश धुरी (बांदा मंडल अध्यक्ष, रवींद्र मडगावकर (आंबोली मंडल अध्यक्ष, अजय गोंदावळे (शहर मंडल अध्यक्ष यांनी केले आहे..