You are currently viewing कंत्राटी वीज कामगार प्रश्न चिघळणार?, सिंधुदुर्गात निदर्शने

कंत्राटी वीज कामगार प्रश्न चिघळणार?, सिंधुदुर्गात निदर्शने

कंत्राटी वीज कामगार प्रश्न चिघळणार?, सिंधुदुर्गात निदर्शने

५ मार्च नंतर बेमुदत आंदोलन, वीज वितरण कोलमडणार?

सिंधुदुर्ग

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करावी, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यांसह सर्व १७ मागण्यांची पूर्तता करावी यासाठी “महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४” च्या माध्यमातून या तिन्ही कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारपासून दोन दिवसांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे. सिंधुदुर्ग येथे असंख्य कंत्राटी वीज कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. पाचव्या टप्प्यातील आंदोलन होणार असून त्याचीही दखल. घेतली नाही तर ५ मार्च नंतर सहाव्या टप्प्यातील बेमुदत काम बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या समिती तर्फे देण्यात आला.

वीज मंडळाच्या मुख्य कार्यालयासमोर हे काम बंद आंदोलन या तिन्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. यावेळी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कर्मचाऱ्यातर्फे जोरदार घोषणा देण्यात आल्या. हमारी ताकद..हमारी युनियन, हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजय असो, यासारख्या घोषणांनी वीज वितरणाच्या मुख्य कार्यालया जवळील परिसर दणाणून गेला.

महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी कुशल असून ते मागील १५ ते २० वर्षापासून काम करीत आहेत. अशा सर्व कंत्राटी वीज कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन व प्रशासन दरबारी मांडले आहेत मात्र या कामगारांना अद्याप रास्त न्याय मिळाला नाही त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनीत कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ ची स्थापना केली आहे. त्यांच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यांसह १७ मागण्या शासनासमोर ठेवण्यात आल्या आहेत.

तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक अधिक पूरक भत्ता दिनांक १ एप्रिल २०२३ पासून मागील सर्व फरकासह ३० टक्के वेतन वाढ देण्यात यावी. तिन्ही वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे. त्यांना नोकरीत सामावून घेईपर्यंत कंपनीमध्ये भरती प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येऊ नये. या भरतीला ऊर्जामंत्री यांनी तातडीने स्थगिती द्यावी. संपाच्या वेळी ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी सह्याद्री शासकीय निवासस्थानी सर्व कायम व कंत्राटी कामगार संघटनेच्या सोबत घेतलेल्या बैठकीत जाहीर केलेल्या निर्णयानुसार तिन्ही कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सूट द्यावी, रानडे समितीच्या शिफारशीनुसार त्यांना विशेष आरक्षण द्यावे तसेच तिन्ही वीज कंपनीमध्ये भरतीसाठीची वयोमर्यादा ही समान असावी व कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, यासारख्या १७ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा