शब्दरंग साहित्य कला संस्थेचे आयोजन…
पुणे
मारूती मंदिर उद्यान सभागृहात शब्दरंग साहित्य, कला संस्थेने लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गीत, नृत्य, चे अनोखे सोलो परफॉर्मन्स सादर केले.अन्वेष देशपांडे- मोदक वाल्या बाप्पा,मृण्मयी मेरुकर-नृत्य: छुम छुम पायी वाजे,अंतरा कानेटकर-नृत्य:आम्ही रानपऱ्या,
अबीर कानेटकर- गीत:खबरदार जर टाच मारुन जाल पुढे तर,आरुष भांडारकर -लाठी काठी प्रात्यक्षिक
सेशा सोनोने हिने मछली जल की रानी है, ट्विंकल, ट्विंकल लिट्ल स्टार, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला ही तीन ही गाणी सुरेख म्हटली.अन्वेष देशपांडे याने धनगर नृत्य सादर केले.ईरजा मेरुकर च्या किलबिल किलबिल पक्षी बोलती नृत्याने लक्ष वेधून घेतले.
कुमार हेरंब अभिनंदन कुमठेकर याने दमदार आवाजात वंदे मातरम गीताने समारोप केला.अलका भालेकर आणि स्मिता देशपांडे यांनी अलबत्या, गलबत्या भूमिकेत सूत्र संचालन अगदी कल्पकतेने रंजक केले.मुला मुलींचे आईवडील, आजी आजोबा, पालक आवर्जून उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शब्दरंग च्या
श्री. चंद्रशेखर जोशी,ज्योती कानिटकर,मीनाक्षी मेरूकर ,कार्यकारिणीने, सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.