You are currently viewing ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मृती प्रित्यर्थ कै.अरुण भार्गवे पुरस्कृत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२२साठी आवाहन

ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मृती प्रित्यर्थ कै.अरुण भार्गवे पुरस्कृत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२२साठी आवाहन

वैभववाडी

भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्मृती प्रित्यर्थ कै.अरुण भार्गवे पुरस्कृत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२२ साठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ऑनलाईन सभेमध्ये राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी प्रत्येक विभागातून एक उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार व राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनी कोकण विभागातून ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या, तक्रारी, प्रबोधन, करण्यात सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्यास (साधकास) गौरविण्यात येणार आहे.

तरी कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर व पालघर जिल्हयातील सक्रिय कार्यकर्त्यांने आपआपल्या जिल्हाध्यक्ष यांचेकडे आपण वर्षभरात केलेल्या कार्याचा प्रस्ताव दिनांक ७ डिसेंबर,२०२२ पर्यंत पाठवावा. जिल्हाध्यक्ष यांनी निवडलेल्या एक प्रस्ताव (जिल्हा कार्यकारणी कडून) विभाग अध्यक्ष किंवा संघटक यांचेकडे दिनांक ९ डिसेंबर,२०२२ पर्यंत पाठवावा.
*कोकण विभागातील एका कार्यकर्त्याची निवड होऊन सन्मानित करण्यात येणार आहे*
स्मृती चिन्ह, मानपत्र व एका ग्राहकाभिमुख मासिकाची वार्षिक वर्गणी असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
*प्रस्तावात खालील बाबी नमूद असाव्यात*
१) पूर्ण नाव-
२) पूर्ण पत्ता, मोबाईल, email id
३) ग्राहक पंचायत महाराष्ट्र कधी पासुन कार्यरत आहात (वर्षे)
४) संघटनेच्या बैठकींना उपस्थिती-
५) ग्राहकाभिमुख व्याख्यान,
६) ग्राहक मार्गदर्शन
७) विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम
८)ग्राहक मेळावा
९) ग्राहक तक्रार निवारण करून न्याय मिळवून देणे.(समस्या निवारण)
१०) आपण केलेल्या कार्याची विशेष उपलब्धि याबाबतची माहिती अपेक्षित आहे. कोकण विभागातील कार्यकर्त्यांने
आपला प्रस्ताव राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील, मु‌.पो.ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग ४१६ ८१० या पत्त्यावर पाठवून द्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड व सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा