You are currently viewing दान.. (दातृत्व)

दान.. (दातृत्व)

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*वक्रतुंड साहित्य समूहाचे प्रमुख लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखीत अप्रतीम समाजप्रबोधनपर लेख..*
*(झरोका)*

*दान.. (दातृत्व)*

गावी असतांनाची गोष्ट, तेव्हा अगदी कडक ऊन्हाळा असे,अन ऊन्हाळा संपत येई, त्या रखरखीत उन्हातही शेतकरी पेरणी करीत,अंगाची लाही होई,तरी तो कुठलीही कुरबुर न करता पेरणीचं काम पुर्ण करी,अन् मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर अगदी उजाड कोरड्याठण अशा रानांत, तरारुन धनधान्याचे कोंब फुटंत,अन् भरभरून पिक येई. तेव्हा मनात विचार येई की शेतकरी अगदी पसाभर धान्य शेतात पेरीत असतो किंबहुना तो पसाभर धान्याचं दान धरणीला देतो अन् त्याच्या मोबदल्यात,अगदी वर्षभर पुरेल ईतकं भरभरून धन धान्याचं पिंक धरणीमाता देत असे..हे असं कसं घडतंं?? हे सारं अगदी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता,धरणीमातेला दिलेल्या मुठभर धनधान्याच्या दानाचं फळ आहे असं वाटुन जाई..
दान, ..दान म्हणजे आपल्याकडे असलेल्या गोष्टी अथवा विचार हे सारं काही निस्वार्थ भावनेने इतरांना देणं किंवा वाटनं…मग ते दान कुठल्याही प्रकारचं असो, पन् ह्यांचा अर्थ असा नाही की आपल्याजवळ असलेलं सर्व वाटुन आपन अगदी कफल्लक होवून इतरांकडे हात पसरवने, हे तर अगदी चुकीचे आहे..
पन्,आपल्या पुराणकाळात अशीही ऊदाहरणे आहे की त्यांनी, सर्वस्वाचं दान केलं आहे, एकतर बळीराजा हा तर अगदी दानशुर होता, त्याची परिक्षा घेण्यासाठी भगवंताला बटुच्या रुपाने वामनावतार घेवून तिन‌ पावलं जागा मागावी लागली.अन् तिन पावलं जागेचं दान मिळाल्यावर प्रसन्न होवुन देवाला बलिराजाचं द्वारपाल बनावं लागलं..


दुसरं उदाहरण, हरिश्चंद्र राजाचं देता येईल, अशा ह्या दानशुर राजाने अगदी स्वप्नात आपल्या गुरुंना आपलं राज्य दान करुन टाकलं.अन जागेपणी जेव्हा खरोखर दान मागण्यासाठी विश्वामित्र आले तेव्हा त्यांना खरोखरंच संपूर्ण राज्य दान देवुन ते सहकुटुंब राज्य सोडून बाहेर गेले.. शेवटी त्यांना
तिथंही अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. दानाच्या ह्या अत्यंत कठिन परिक्षेत पुर्णपने ऊत्तिर्ण होवुन गुरुच्या प्रसन्नतेने सत्यवचनी दानशूर हरिश्चंद्र म्हणून प्रसिद्ध झाले…

दान अनेक प्रकारचे आहे, अन्न, वस्त्र,निवारा,हया जिवनवश्चक गरजे व्यतीरिक्त, विद्यादान हेसुद्धा अत्यंत श्रेष्ठ मानले जाते.अन ही सर्व दाने मनुष्याला मोक्षाकडे घेवून जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात… भगवत्गितेत,ह्या दानाचे तिनं प्रकार सांगितले आहे .सात्विक राजस आणि तामसदान,ही तिन्ही दाने आपल्या गुणांनुसार फळे देत असतात. कोणत्याही प्रकारचे दान,देताना मात्र काही गोष्टींचे पथ्य पाळायला हवे,दान देताना निस्वार्थी वृत्ती आणि मी पनाचा
गर्व नसावा.आणी गृप्तता बाळगून दान केले पाहिजे,कुठल्याही प्रकारचा बडेजाव नसावा, अशा दानाचे फळ हे शतगुणांने वृद्धिंगत होत असते .अन ते किर्तिरुपाने जगात उरते…..

राजाहरिश्चंद्राच्या बाबतीत एक मान्यता होती. तो तर नेहमींच आपली नजर खाली झुकवुन मोठ्या विनम्रपणे दान देत असे‌,अशा प्रकारे दानाची बातमी ही तुलसीदासाच्या कानांवर आली तेव्हा हरिश्चंद्राची भेट घेतली अन् त्यानी राजाला विचारले ,”राजन आपन तर थोर दानशूर दाते आहात, ‌पन,
आपन,सदैव नम्रपणे,माथा झुकवुन, खाली नजर करुन दान का देतात ??”” तेव्हा राजा नम्रपणे म्हणाला,
,”महानुभाव, खरं तर, परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ दाता आहे.मी तर त्याचा एक नम्र सेवक असुन त्यांने दिलेलं हे सारं काही प्रजाजनांच आहे.अन् मी, ते वाटण्याचं काम करतोय, पन् लोकं त्या ईश्वराला धन्यवाद न देता माझा उदो उदो करतात, त्यामुळे मी चुकिचं तर करिंत नाही ना?असं मला वाटत,
अन, शरमेने मान खाली जाते. मला वर पाहायची हिंमत होत नाही….
अशा प्रकारे दानं हे अगदी सर्वश्रेष्ठ दान समजल्या जाते.अगदि निस्वार्थभावना,
विनम्रता, आणि निगर्वी वृत्ती,आणी सत्य हृया सदृगुणांचा अनुपम संगम,हा दानशूर दात्यांमध्ये दिसुन येतो.हेंच दानाचं गुपिंत आहे..”मी दान करतो” ही भावना मनाला कधीच स्पर्श करीत नाही,असं दान सर्वश्रेष्ठ आहे,अन् हे दान दात्याला धर्म अर्थ,काम,अन् मोक्षप्राप्ती मिळवुन द्यायला अत्यंत सहायक ठरते..
प्रसिद्ध रानकवी, म्हणून ओळखले जाणारे ना.धो.महानोर आपल्या कवितेत म्हणतात “ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे,आणि मातीतुन चैतन्य गावे”…,अन् अशाप्रकारे आभाळ आपल्या धरणीमातेला सहस्रावधी पाऊसधारांचं दान देते, त्यामुळे सारी धरती चैतन्यमयी होवून जाते.. खरं तर निसर्गातील पंचमहाभूते ही कसलीही अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने सृष्टीतील जीवसृष्टीसाठी भरभरून दान देत असतात.पन मानव त्याच्या मोबदल्यात निसर्गाचे प्रदुषण करुन त्याचा विध्वंस करतो. सद्यपरिस्थितीत तर मानवाने निसर्गाच्या सोज्वळ रुपाचा नाश करण्याचा विडांच उचलला आहे.अन् ह्या अनुषंगाने प्रसिद्ध साहित्यिक, कवी, वि.दा करंदीकरांच्या कवितेची आठवण येते.ते म्हणतात, “देनारयाने देत जावे ,घेणारयाने घेत जावे, घेणारयाने घेता घेता एक दिवस देणार्यांचे ह्यांत घ्यावे” हे बरोबरच आहे..पन् मनुष्याला फक्त दान घ्यायचं माहीत आहे. देणारयाचा दातृत्वाचा गुण घ्यावा ह्याकडे तो जाणुनबुजून दुर्लक्ष करित आहे.अन् ही़ मानवी दुष्प्रवृती मानवाच्या प्रगतीसाठी अडसर बनु पाहंत आहे.असंच म्हणावंसं वाटतं…

©️जगन्नाथ खराटे- ठाणे ‌.
१९नोव्हेंबर२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा