मुंबई
अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेस च्या वतीने डिस्कवरी ऑफ इंडिया आणि भारत जोडों ह्यावर मुंबई येथील इस्लाम जिमखाना येथे भव्य चर्चा सत्र आयोजित केले गेले होते. त्यात सदर विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शशी थरूर आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर उपस्थित होते.
स्व जवाहरलाल नेहरू ह्यांनी कोणतीही सामग्री हातात नसताना, संदर्भ घेण्यासाठी साहाय्य नसताना तुरुंगवसात शिक्षा भोगताना डिस्कवरी ऑफ इंडिया सारखे महान ग्रंथ कसा काय लिहिला असेल ह्याचे खूप सुंदर विवेचन केले. तसेच आज भारत जोडो यात्रा कशा प्रकारे देशाच्या एकतेसाठी आवश्यक आहे व काँग्रेस नेते राहुल गांधी कशा प्रकारे प्रचंड कष्ट घेऊन लोकांपर्यंत प्रेम ,शांतता , सलोखा , बंधुभाव निर्माण करत आहेत ह्याबाबत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र काँग्रेस चे प्रवक्ता ॲड.धनंजय जुन्नरकर हे देखील सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदर विभागाचे मुंबई अध्यक्ष मॅथ्यू अंथोनी, उपाध्यक्ष सुमेध गायकवाड, सचिव,झारा परवल ह्यांनी जिल्हा अध्यक्ष जय कुमार ह्यांनी प्रयत्न केले.
मुंबई काँग्रेस तर्फे अजित कोतवाल , गौतम गोखले , दिपक वाघमारे , हरी कृष्णन उपस्थित होते.
कार्यक्रमच्या शेवटी श्रोत्यांनी प्रश्नोत्तरे विचारली व राष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली