याबाबत महसूल विभाग गप्प का ? ; उप-जिल्हा संघटक तथा विभाग अध्यक्ष अभय देसाई
दोडामार्ग
सध्या दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध खडी क्रशर, चिरे खाणी यांसारखी अवैध उत्खनने सुरु आहेत. तालुक्यातील महसुल विभाग आणि प्रांत कार्यालय मधील अधिकारी मात्र याकडे पूर्ण पणे डोळेझाक करत आहेत..
महसुल विभाग या अवैध उत्खननांवर कारवाई का करत नाही.अवैध उत्खनन करणार्यांचे व संबंधीत अधिकार्यांचे एकमेकांशी चांगलेच धागे दोरे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षा पूर्वी तालुक्यातील साटेली- भेडशी येथील गायरान म्हणून समजल्या जाणाऱ्या शासनच्या जागे मध्ये काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन केले होते. त्यावर शासनाकडून कारवाई सुद्धा करण्यात आली होती. मात्र त्या जमिनीचा सर्वे व्हावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली होती दोन वर्षे पूर्ण होऊन देखील उद्याप पर्यंत त्या जमिनीचा सर्वे झालेला नाही.
तालुक्यात महसुल विभाग असताना शासनच्या जमिनी मध्ये उत्खनन झालेच कसे? उत्खनन होत असताना अधिकारी झोपले होते का? त्यावेळी जे महसुलचे अधिकारी या भागात कार्यरत होते त्यांची वरीष्ठ पातळी वरून रितसर चौकशी पुढील 15 दिवसात व्हावी अन्यथा प्रांत कार्यालय सावंतवाडी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे उप जिल्हा संघटक अभय देसाई यांनी दिला.
तसेच दोडामार्ग तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खनानांवर व अवैध उत्खनन करणाऱ्या व्यक्तींच्या पाठशी उभे राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करणार असे मनसेचे उप जिल्हा संघटक तथा कळणे विभाग अध्यक्ष अभय पांडूरंग देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.