You are currently viewing कुडाळ तालुक्यात पहिल्या दिवशी ग्रा. प. निवडणुकी साठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

कुडाळ तालुक्यात पहिल्या दिवशी ग्रा. प. निवडणुकी साठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

कुडाळ

कुडाळ तालुक्यात होणाऱ्या ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय येथे ग्रामपंचायत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपलब्ध करण्यात आले आहे अर्ज दाखल करण्यासाठी एकाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही

कुडाळ तालुक्यामध्ये ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांसाठी आज सोमवार २८ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे या निवडणुकीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत साठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे मात्र यांना ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नसून सर्व ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कुडाळ तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुडाळ तहसील कार्यालय येथे यावे लागणार आहे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + three =