*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके यांनी सौ.सरिता परसोडकर यांच्या पाषाण काठ कविता संग्रहाचे केलेले रसग्रहण*
पुस्तकांचे नाव — पापणकाठ
कवयित्री सौ सरिता परसोडकर
पापण काठ : सौ सरीताताई परसोडकरांचा पहिला काव्यसंग्रह
७२ वेगवेगळ्या विषयावरच्या काव्यसुमनांनी गुंफलेला ही काव्यमाला त्यानेत् यांच्या स्वर्गीय मातापित्यांच्या चरणी अर्पित केली आहे
सुरवातीलाच प्रकाशीय मनोगत वाचतांना आतील कवितांचा बाज कसा असेल हे सुज्ञ रसिक वाचकांच्या लक्ष्यात येते त्यासाठीत्यांनी काही कवितांची उदाहरणे ही दिली आहेत
कवयित्रीला लहानपणापासूनच लिखाणाची आवड! हा वारसा वडिलांकडून मिळालेला त्यांच्याकडूनच लिखाणाची प्रेरणा मिळाली म्हणून कृतज्ञतेने हा काव्यसंग्रह त्यांनी स्वर्गीय मात्या पित्याच्या चरणी अर्पण केला आहे
एकूण ७२ रचना असलेल्या ह्या संग्रहाची सुरवात *गाडी घुंगराची* ह्या सुंदर कवितेने झाली आहे या घुंगराच्या गाडीत बसून आपण पुढे वाचू लागलो की
समाजातील विविध विषयांवरील काव्य विचारांशी आपली ओळख होऊ लागते
ह्या कवितांमध्ये बालपण, मैत्री, विविध सामाजिक प्रश्न ,निसर्ग वर्णन,,प्रेमकाव्य ,देशभक्ती ईश्वराविषयी पूज्य भाव, समाजाप्रती आपलं देणं असे अनेक विषय ताईंनी हाताळलेले आहेत
त्याची विचारांची स्पष्टता उल्लेख निय आहे
*गुढी मांगल्याची* ह्याकवितेत आपले मन मोकळे करतांना त्या लिहितात– *जरी कंटक समोर*
*त्याला समजली फुले सर्व* *क्षेत्रामध्ये आता घेत हाती मुले*
श्री संत गजानन महाराजांविषयी *भक्तिगीत* ह्या कवितेत त्या लिहितात– *ऋषीपंचमी* *गुरवारला, जो पारायण करी*
*दास तयांचा होउनि बाबा*—कवितेत महाराजाविषयी असलेला विश्वास सुंदर शब्दात व्यक्त झाला आहे
निसर्गाचे वर्णन खूप अप्रतिम झाले आहे विविध विषयावरच्या एकसे बढकर एक कविता वाचतांना आपण शेवटची *हृदय विलासिनी* ही कविता वाचू लागतो अन लक्ष्यात येते की आतापर्यंतचा त्यांचा कविताप्रवास कसा झाला त्यासाठी पापणकाठ उष्णोदकांनी भरल्यामुळे नयनातील काजळ रेखा वाहून गेल्या समाजात किती बंधने असतात हे व्यक्त करताना
*बंधन काही सांगून गेला कटी तुझी मेखला*
*कशी सांभाळते सखे तू सर्जन सोहळ्याची ती कला* हे शब्द तरल हृदयाच्या मनाला अंतर्मुख करतात
असा हा *सौ सरीताताईंचा काव्यसंग्रह* आपल्या संग्रही असायलाच हवा ज्यामुळे नवकवींना ही लिहिण्याची प्रेरणा मिळेल
सरिताताईंना भावी प्रगत वाटचालीसाठी शुभेच्छा
प्रकाशक– लोकव्रत प्रकाशन:पुणे
प्रथम आवृत्ती २६सप्टेंबर २०२२
पृष्ठसंख्या १४८
एकूण काव्यरचना ७२
मुखपृष्ठ शिरीष कुलकर्णी
पुस्तक किंमत रु १९०
प्रतिभा पिटके
अमरावती