You are currently viewing भारतीय संविधान

भारतीय संविधान

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*भारतीय संविधान*

ज्यामध्ये आहेत बघा
सर्वांसाठी प्रावधान,
तो ग्रंथराज म्हणजे
भारतीय संविधान..।१।

स्वतंत्र भारतामध्ये
जनतेचे अधीकार
याचा त्यात समावेश
ज्यात हे सर्व प्रकार..।२।

गरीब श्रीमंत सारे
अधिकाराने समान,
हे आम्हास शिकविते
भारतीय संविधान..।३।

संपत्तीचे वाटप नी
न्याय निवाडा स्वरूप,
संविधानात मिळते
या समाधानाचे रूप..।४।

उच्चनीच्च भेदभाव
असू नये समाजात,
याचाही उल्लेख आहे
आपल्या संविधानात..।५।

बाबासाहेबांना आज
धन्यवाद देऊ सारे,
ज्यांच्यामुळे वाहताहे
समानतेचे हे वारे..।६।

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा