You are currently viewing तू…..

तू…..

तू…..

आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तू.

माझ्या डोळ्यात तरळणारे,
दिवास्वप्न आहेस तू.

हात जोडून देवाकडे मागीतलेलं,
ते मागणं आहेस तू.

नयनांतून ओघळणाऱ्या आनंदाश्रूतला,
आनंद आहेस तू.

गालावर खुलणाऱ्या खळीतले,
गोड हास्य आहेस तू.

शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा,
तो श्वास आहेस तू…

तूच प्रेम, तूच जीवन, तूच ध्यास…
अंतर्मनाची आस आहेस तू…

आयुष्यभर..

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =