You are currently viewing आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासोबत युती करण्याबाबतचा निर्णय पक्ष पातळीवर होणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासोबत युती करण्याबाबतचा निर्णय पक्ष पातळीवर होणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे

कणकवली :

 

आज कणकवलीत हॉटेल नीलम्‍स कंट्रीसाईड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या सर्व प्रश्‍नांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तरे दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘महाराष्‍ट्र ते दिल्‍ली पर्यंतच्या भाजप नेत्‍यांवर टीका कराल तर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही. हे मी पोलिसांसमोर सांगतोय असा इशारा आज दिला.’ तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे नाव न घेता, पुन्हा कुणी भाजपच्या नेत्‍यांवर टीका केली तर त्‍यांना जिल्हयाबाहेर जाऊ देणार नाही असा इशारा दिला.

यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार नीतेश राणे उपस्थित होते. श्री. राणे यांनी या पत्रकार परिषदेत शिवसेनेचाही समाचार घेतला. शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्‍यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही असे ते म्‍हणलो.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासोबत युती करण्याबाबतचा निर्णय पक्ष पातळीवर होणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. रिफायनरी प्रकल्‍प असो अथवा सीवर्ल्ड किंवा कोकणात येणारे अन्य उद्योग, या सर्व उद्योगांना शिवसेनेकडून सातत्‍याने विरोध केला जातो. नंतर प्रकल्‍प सुरू करण्यासाठी तोडपाणी केली जाते. एन्‍रॉनबाबतही शिवसेनेने तोडपाणी केली होती. खासदार विनायक राऊत हे स्वत: उद्योजकांकडून पैसे घेतात. त्‍यामुळे संपूर्ण शिवसेना पक्ष म्‍हणजे तोडपाणी पक्ष आहे अशीही टीका श्री.राणे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 2 =