You are currently viewing सावंतवाडीत आज संध्याकाळी भाजपा चंद्रकांत बावनकुळे यांची उपस्थिती

सावंतवाडीत आज संध्याकाळी भाजपा चंद्रकांत बावनकुळे यांची उपस्थिती

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील आदिनारायण मंगल कार्यालयात आज सायंकाळी भाजपा प्रांताध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे .

यावेळी बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजाला संबोधित करणार असून समाजाच्या मागण्या व त्यांना येणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर चर्चा करणार आहेत. तरी यावेळी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन संजू परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =