You are currently viewing बांदा येथे तीन दिवस पर्यटन व्यवसायासंबंधी प्रशिक्षण शिबिर…

बांदा येथे तीन दिवस पर्यटन व्यवसायासंबंधी प्रशिक्षण शिबिर…

बांदा

येथील गोगटे वाळके महाविद्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त सहकार्याने पर्यटन व्यवसायासंबधी ८, ९ व १० डिसेंबरला तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आहे. या प्रशिक्षणात कोणीही १८ ते ५० वयोगटातील पर्यटन उद्योग इच्छुक महिला, पुरुष सहभाग घेऊन लाभ घेऊ शकतात. या प्रशिक्षणात शासकीय योजना, सवलती, शासन निर्णय, परवाने, वित्त सहाय्य, गुंतवणूक, पर्यटन व्यवस्थापन, शिष्टाचार, पर्यटनातून आनुषंगिक लाभ- फळ प्रक्रिया उत्पादने व विक्री, पर्यटन स्थळे, निवास व्यवस्था, स्वच्छता व सुरक्षा जाहिरात, वेबसाईट इत्यादी बद्दल तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क ५०० रुपये असून यात नोंदणी, दुपारचे भोजन, चहा समाविष्ट आहे. ‌सदरचे प्रशिक्षण गोगटे वाळके कॉलेज येथे होईल.‌ वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४.३० अशी असेल. सर्व सहभागींना अंतिम दिवशी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यात पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी वित्त सहाय्य, परवाना यासाठी होईल. नोंदणी व शुल्क लिंक आँनलाईन असून अधिक माहितीसाठी मो. 9421268204/
9420738896 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 6 =