You are currently viewing सावडता!सावडता !

सावडता!सावडता !

*जागतीकसाहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखीत अप्रतीम काव्यरचना*

*सावडता!सावडता !*

जाळलं!गेले ते सारे निघून
एकानेही मागे पाहिलं नाही वळून
कवटी फुटायचा आवाजाला
कुणी नाही गेलं ! दचकून

राखेच्या ढिगा-यात उरली हाडे
ती सावडत सावडत राहिलो
कुठेच दिसेना!गर्व पद प्रतिष्ठा!पैसा तरीही राखेला खालीवर करत राहिलो

डोक्यात कालवर सत्तेची धुंदी भिनली
कुणाला कधी!भीक नाही घातली
राखेत सावडत !सत्ता शोधत राहिलो
हाडाला चिटकलेली धुंदी नाही दिसली

राखेत काहीतरी शिल्लक हवं होत
मडक्यात! कोंबता तरी आलं असत
हाडं काही तिथेच सोडावी लागली
राखेत ऐश्वर्य शोधता आलं असत ..!

मद मस्सर स्वप्न आशा श्वास नशा
सावडता!सावडता!शोधत राहिलो
देवा!अरे किती !आग पाखडशील
कुठं गेलं सार! राखेत शोधत राहिलो

राखेत ऊब !धगधग! शिल्लक होती
पूर्वज त्याचे सोबत न्यायला आले
पाण्यात धुवून!स्वच्छ मोकळं करून
सोबत त्याला कायमचे घेवून गेले ..!!

बाबा ठाकूर

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 19 =