You are currently viewing नरडवे इंग्लिश स्कुलमधील सर्व माजी विद्यार्थ्यांचा २७ ला स्नेहमेळावा

नरडवे इंग्लिश स्कुलमधील सर्व माजी विद्यार्थ्यांचा २७ ला स्नेहमेळावा

कणकवली

अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ मुंबई ,संघाची स्थानिक कमिटी ,शालेय समिति यांच्या वतीने १९६३ ते २०२२ या कालखंडात नरडवे इंग्लिश स्कुल मधून शिकून गेलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा ,तसेच नरडवेस्थित व मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व विद्यार्थी ,नागरिक ,ग्रामस्थ ,हितचिंतक यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सोशल सर्व्हिस हायस्कुल ,ए .सि .हॉल ,दामोधर हॉल कंपाउंड ,परेल ,मुंबई १२ ,येथे सकाळी ९.३० ते ४ ह्या वेळेत आयोजित केलेला आहे .


मेळाव्यासाठी गुरुवर्य काजरेकर सर व अन्य नामांकित व्यक्ती ,कलाकार उपस्तित राहणार आहेत .सर्वांसाठी अल्पोपहार व भोजनाची सोय आहे .सर्वानी वेळेत उपस्तित राहून स्नेह मेळावा यशस्वि करावा असे आवाहन अखिल नरडवे ग्रामोद्धार संघाच्या कार्यकारिणीच्यावतीने सरचिटणीस विजय वसंत सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =