You are currently viewing झुकली ❤️उन्हे

झुकली ❤️उन्हे

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखीत अप्रतीम काव्यरचना*

# *झुकली ❤️उन्हे* #

अर्धोन्मिलीत ती नजर टाकुन
नीळा दुपट्टा थाट पैहिलवानी
निरीक्षण चालले *उर्वशिचे*
गोदातीरी ही चाणाक्ष तरूणी

मदन फुलला *अंगा अंगात*
लाल मण्यासह “सोन रंगात”
*तंग पोषाख* फिक्या रंगात
हळूच डोकावे गो-या गळ्यात

शुभ्र मोत्यांची झुंबरं लोंबती
कुयरी सम उभ्या *कानात*
लाल चंद्र तो शोभतो ललाटी
नील गरगरीत लघु *गोलात*

कुंतल कुरुळे रूळती भाळी
जीवणीमध्ये शोभून दिसती
दोन ओठातून हळूच हंसती
शुभ्र *हि-यासम दंत* पंगती

सुलक्षणा तू सांज समयाला
फिरतेस कशी तू वेळीअवेळी
दाटून येईल काळोख लवकर
झुकली उन्हे *पश्चिम भाळी*

वि ना य क ❤️ जो शी
९ ३ २ ४ ३ २ ४ १ ५ ७
२२ नो व्हें बं र् २ ० २ २

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =