You are currently viewing “आम्ही सावित्रीच्या लेकी

“आम्ही सावित्रीच्या लेकी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*”आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी
अभिमानाने जगतो
मान उंचावून आता
जगाकडे या बघतो

तुझ्यामुळेच माऊली
आता सारं ज्ञान आलं
जीवनाच्या वाटेवर
जगण्याचं भान आलं

पुढे पडता पाऊले
तुझी आठवण येते
भोगण्याची परिसीमा
मला आज जाणवते

शिक्षणाचा ,कल्याणाचा
तूच वसा आम्हा दिला
नारी जातीचा सन्मान
तुझ्यामुळे वाढलेला

दिली हाती धूळपाटी
आम्ही भाग्यवंत झालो
तुला वंदन कराया
तुझ्या पाया पाशी आलो

तुझ्या पाया पाशी आलो

जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक 98 90 25 89 77

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =