मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा व आगामी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक ; मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची माहिती
मालवण :
मालवण तालुका मनसेची महत्वपूर्ण बैठक गुरुवार २४ नोव्हेंबर सकाळी १०.३० वाजता मालवण पंचायत समिती नजीक असणाऱ्या हॉटेल विशाल येथे आयोजित करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ३० नोव्हेंबर रोजी होत असलेला कोकण दौरा व आगामी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी मालवण शहर व तालुक्यातील मनसे, मनवीसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले आहे.