You are currently viewing भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्गात सामुदायिक शेतीचा प्रयोग

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्गात सामुदायिक शेतीचा प्रयोग

मालवण :

भारत हा शेती प्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी जगला तर देशाची अर्थव्यवस्था जगु शकते. म्हणुनच भाजपा च्या किसान मोर्चा ने पडीक जमीनी कराराने घेऊन त्यावर सामुदायिक शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले व ताबडतोब कृतीतून दाखवून दिले. 6444 नंबरचे एक काडी लावणी भात, ही लावणी श्री पद्धतीने 10 इंच × 10 इंच च्या रांगेत केली. ही लावणी कृषी तज्ज्ञ कृषी अधिकारी यांच्या उपस्थित झाली.

ही सामुदायिक शेती किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सन्मानिय श्री. उमेश सावंत, प्रगतशील शेतकरी व ओझर हायस्कूलचे चेअरमन व किसान मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर नरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यासाठी भाजपा किसान मोर्चा चे मालवण तालुकाध्यक्ष श्री. महेश सारंग, उपाध्यक्ष श्री. प्रसाद भोजने, सल्लागार श्री. हरिभाऊ केळुसकर, श्री. संजय मळेकर, या टीमने स्वतः ही सामुदायिक शेती गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने करत आहेत.

सध्या होत चाललेला शेतीकडचा दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त लोकांनी पुन्हा शेतीकडे वळावे म्हणून मालवण तालुका किसान मोर्चा हा प्रयत्न करत आहे. हि शेती हडी गावात केली जात आहे. या साठी हडी मधील गावकर कुटुंबाची दोन एकर क्षेत्र असलेली जागा निवडण्यात आली आहे. माहिती किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 4 =