You are currently viewing न्हावेली गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक

न्हावेली गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक

सावंतवाडी / न्हावेली :

 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर अखत्यारित असलेल्या न्हावेली गावच्या देवस्थान उप समिती अध्यक्षपदी आनंद नाईक यांची तर सचिव पदी संजय दळवी यांची एकमताने निवड जाहीर झाली आहे. न्हावेली येथे पार पडलेल्या बैठकीत उपसमितीची कार्यकारणी गठित करण्यात आली आहे. मौजे न्हावेली गावचे देवस्थान श्री देव रवळनाथ, माऊली यांच्या व्यवस्थापन समितीची ही कार्यकारणी आहे.

नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष आनंद नाईक, सचिव संजय दळवी, खजिनदार गितेश परब, सदस्य अनंत परब, भिवा आत्माराम नाईक, लाडू नाईक, मोहन नाईक, गंगाराम मेस्त्री, सदानंद न्हावेलकर, अर्जुन नाईक, सगुण नाईक, दिगंबर नाईक, विठोबा गावडे, राजन कालवणकर, उदय पार्सेकर यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =