कणकवली मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
कणकवली
शहरातील बिजलीनगर येथील प्रहार भवन ते मराठा मंडळ हा हॉटमिक्स रस्ता मंजूर होऊन ६ महिने उलटून गेलेत मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. येत्या ८ दिवसांत या रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या प्रभागाचे नगरसेवक तथा विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना आज दिले.
श्री.नाईक यांनी निवेदनात म्हटले की, मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा प्रहार भवन ते मराठा मंडळ रोड हा रस्ता सध्या पूर्ण खड्डेमय झाला आहे. रस्त्याच्या नूतनीकरण साठी १८ लाखांचा निधीही मंजूर आहे. स्थानिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. येत्या ८ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन छेडणार आहोत.