You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा ग्रामपंचायतीचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांचा भाजपा मध्ये प्रवेश

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा ग्रामपंचायतीचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांचा भाजपा मध्ये प्रवेश

पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण व मा. खासदार निलेश राणे ( भाजपा प्रदेश चिटणीस ) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला भाजपाचा धक्का

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कडुन शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देत असताना वेंगुर्ले तालुक्यातील भाजपने उभादांडा ग्रामपंचायतीचे शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांना भाजपा मध्ये घेऊन आणखी एक धक्का दिला.


भाजपचे प्रदेश सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रविंद्रजी चव्हाण व भाजपा प्रदेश चिटणीस मा.खास.निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला . पक्ष प्रवेशावेळी उभादांडा गावातील प्रलंबीत विकास कामांची चर्चा झाली . यावेळी उभादांडा गावातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा शब्द पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी सरपंच देवेंद्र डिचोलकर यांना दिला. तसेच लवकरच आपल्या सोबत असलेले ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते भाजपा मध्ये प्रवेश करतील असे देवेंद्र डिचोलकर यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , दादु कवीटकर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा