बांदा
मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत आयोजित भाजी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रशाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी यावेळी मुलांना भाज्यांचे आपल्या आहारातील महत्व व उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध भाजी व त्या रंगांचे कपडे परिधान केले होते. यावेळी स्पर्धा घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे (प्रथम दोन क्रमांकानुसार) ज्यु. केजी – मिताली साळगावकर, मायरा रॉड्रीग्स, सिनियर केजी -सार्थक वालावलकर, इयत्ता पहिली – कौशल मेस्त्री, सुयश परब, इयत्ता दुसरी – लिजा मारनेकर, तनिष्का महाले, इयत्ता तिसरी – स्टेला फर्नांडिस, तनिषा राऊळ, इयत्ता चौथी – हफसा शेख, यज्ञा वारंग.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. शिरोडकर, सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रीग्स, तेजस्वी गावडे, प्राची परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी गावडे यांनी केले. तर आभार प्राची परब यांनी मानले.