You are currently viewing कै. सत्यविजय भिसे यांच्या समाजकार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा- आ. वैभव नाईक

कै. सत्यविजय भिसे यांच्या समाजकार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा- आ. वैभव नाईक

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २० वा स्मृतिदिन साजरा

कणकवली

सत्यविजय भिसे यांनी समाजकार्यातून आपला वेगळा ठसा उमटवला होता. नेहमीच ते सर्वसामान्य माणसांच्या मदतीला जात असत. त्यांनी युवा वर्गाचे संघटन उभारले होते. त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घेणे गरजेचे आहे. गेली २० वर्षे कै.सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा करून रक्तदान शिबीर त्यांच्या मित्रमंडळाकडून घेण्यात येते हे कौतुकास्पद आहे. आज सत्यविजय भिसे असते तर इथले राजकारण वेगळे असते अशा शब्दात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कै. सत्यविजय भिसे यांना श्रद्धांजली वाहिली.

कै. सत्यविजय भिसे यांचा २० वा स्मृतिदिन आज कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे,अरविंद दळवी, तेली सर, चंदू परब, मधु चव्हाण, सरपंच सौ. जाधव, लवू पवार, नितीन गावकर, बंडू लाड, संतोष मसुरकर, बाबू सावंत, सत्यविजय जाधव, नितीन हरमलकर, सुनील हरमलकर, निकेतन भिसे, आदींसह कै. सत्यविजय भिसे प्रेमी व मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 10 =