*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*विरांगणा झाशीची राणी*
नाव घेता जीचे क्षणात
शत्रूचा जीव होई पाणी,
अशी होती शुर आमची
वीरांगना झाशीची राणी..।१।
प्रत्यक्ष तलवारीसह
पराक्रम रणांगणात,
टाच मारताच अश्वाला
धडकी शत्रूच्या मनात..।२।
मूल बांधुनी पाठीवर
तत्पर युद्ध करावया,
राज्याचे रक्षण करणे
सिद्ध त्यासाठी मरावया..।३।
पुरुषांनी लाजावे ऐसे
दाखवी शौर्य जगतास,
अमर झाली लक्ष्मी बाई
गाजतो तिचा इतिहास..।४।
समोर नेहमी अमुच्या
असावा तिचाच आदर्श,
नम्र व्हावे वंदनासाठी
पायास तिच्या करु स्पर्श..।५।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*