You are currently viewing घोणसरी मध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का

घोणसरी मध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का

अनेक कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

कणकवली

कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्ते व देवस्थानचे मानकरी प्रमोद रावराणे, सतीश जाधव, अनिकेत खाडे, किशोर सावंत आदींनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कालपासून आमदार नितेश राणेंनी भाजपा प्रवेशाचा सिलसिला सुरू केला असून, अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षांना सोडचिट्टी देत भाजपाचा झेंडा हाती घेतला. आज या प्रवेश प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती मनोज रावराणे आदि उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांनी या कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा