You are currently viewing श्रध्दा आणि सबुरी

श्रध्दा आणि सबुरी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सुभाष उमरकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*श्रध्दा आणि सबुरी*

जेव्हा पेटवशील अंधार चिरण्या
समई देव्हा-यातील होईल मी ….!

वात होऊनी निरंतर जळेल
जीवन प्रकाशमय तुझे करीन मी ….!

भाव भक्तीचा खेळ हा सारा
नाद होऊनी गुंजेल मी …!

दरवळेल सुंघद जीवनात तुझ्या
धुप होऊनी पेटेल मी …!

वाहशील जेव्हा सुंदर फुले
सुगंध होऊन पसरेल मी ….!

आसनस्त होऊन जपमाळ जपते
नाम तुझेच मग होईल मी ….!

तु धागा हो घट्ट सुखाचा
गाठ आयुष्याची बांधिल मी …!

चालेल पुजा ही नित्य निरंतर
तु भक्ती भाव होईल मी ….!

दगडात वसु दे देवपण आता
नतमस्तक तिथेच होईल मी …!

असाच चालतो खेळ श्रध्देचा
सबूरी मनात ठेवेल मी ….!

देव नाही देवळात सखे
प्रेमातून हे सिध्द करीन मी ….!

*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा