You are currently viewing 7 डिसेंबरपासून संसद हिवाळी अधिवेशन

7 डिसेंबरपासून संसद हिवाळी अधिवेशन

दिल्ली :

 

संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अशी माहिती संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान २३ दिवसांत १७ बैठका होणार आहेत. देशाच्या अमृत काळात अधिवेशनादरम्यान विधिमंडळ कामकाज आणि इतर बाबींवर चर्चेची अपेक्षा आहे. या दरम्यान सर्वपक्षीय संसदीय सदस्यांकडून विधायक चर्चेची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे पहिलेच अधिवेशन असेल जेव्हा उपाध्यक्ष जगदीप धनखर राज्यसभेचे कामकाज चालवतील. सरकार आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार करत असताना, विरोधक अनेक विषयांवर चर्चेची मागणी करणार आहेत.

निवडणुकीच्या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या काळात संसदेचेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान झाले, तर गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा