सिंधुदुर्गनगरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते सन 2022-23 या वर्षाच्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो, सॉफ्टबॉल, कुस्ती, कबड्डी, बेसबॉल व कॅरम, नेटबॉल या सर्व गटाच्या स्पर्धांच्या तारीखामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहेत.
कुडाळ हायस्कुल कुडाळ ता.कुडाळ येथे 1 डिसेंबर 2022 रोजी सॉफ्टबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे 1 ते 3 डिसेंबर 2022 रोजी खो-खो स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दि. 3 डिसेंबर 2022 रोजी बेसबॉल स्पर्धा. तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ला ता.वेंगुर्ला येथे दि. 5 ते 6 डिसेंबर 2022 रोजी कुस्ती स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे 8 ते 10 डिसेंबर 2022 रोजी कबड्डी स्पर्धा. श्री वा.स. विद्यालय मागणगाव ता. कुडाळ येथे दि. 7 ते 8 डिसेंबर 2022 रोजी कॅरम स्पर्धा. रेकोबा हायस्कुल वायरी ता. मालवण येथे दि.7 डिसेंबर 2022 रोजी नेटबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय शालेय बॉस्केटबॉल या खेळाच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या दिनांक पुढीलप्रमाणे आहेत. रेकोबा हायस्कुल येथे दि. 5 डिसेंबर 2022 रोजी 14 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुली यांची बास्केटबॉल स्पर्धा. रेकोबा हायस्कुल वायरी ता. मालवण येथे दि. 6 डिसेंबर 2022 रोजी 19 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुले बास्केटबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी यांची नोंद घ्यावी व आपल्या खेळाडूंना स्पर्धांच्या ठिकाणी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.