You are currently viewing आंबोली- नांगरतास आजरा रोड येथे महिंद्रा थार गाडीला अपघात…

आंबोली- नांगरतास आजरा रोड येथे महिंद्रा थार गाडीला अपघात…

आंबोली- नांगरतास आजरा रोड येथे महिंद्रा थार गाडीला अपघात…

एक ठार; सहा जखमी.

आंबोली

आंबोली- नांगरतास आजरा रोड येथे महिंद्रा थार गाडी झाडावर आढळल्याने उस्मानाबाद येथील दत्ता जाधव (वय 28)हा युवक जागीच ठार झाला.त्यातील 6 जण जखमी झाले.अपघाताची माहिती वाहनचालकांनी आंबोली पोलीस स्थानकात दिल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. याठिकाणी उपचार करून बांबोळी येथे पाठवण्यात आले.उस्मानाबाद येथून गोवा येथे हे युवक जात असताना झाडावर आढळून अपघात झाला.

या अपघातात जखमींची नावे महादेव भगवान बांगर वय 31, हॉटेल व्यवसाय,रा.चरेमळा, ता.कळंब,गणेश दिलीप साळुंखे वय,32, जामखेडनगर,अहमदनगर,बालाजी भगवान बांगर,रा.चरेमळा,सुनील कृष्णा कुलभैय्या,धंदा मच्छिमारी,रा.शिरोडा,शिरोळ,जिल्हा बीड,नवनाथ विठोबा जाधव,रा.केज,जिल्हा बीड,विष्णू बांगर,माजी सैनिक,रा.चरेमळा,ता.कळंब,जिल्हा धाराशिव(उस्मानाबाद).जखमींना गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 3 =