You are currently viewing बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये पदवीधर उमेदवार रत्नाकर आगलावे निवडणूक रिंगणात उतरणार

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये पदवीधर उमेदवार रत्नाकर आगलावे निवडणूक रिंगणात उतरणार

सावंतवाडी :

 

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत आता शहरात राजकीय वातावरण हळूहळू रंगू लागले आहे. इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात जोर धरू लागले आहेत. यंदा प्रभाग ३ मध्ये पदवीधर उमेदवार म्हणून रत्नाकर आगलावे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या प्रभागातील उमेदवारांचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रत्नाकर आगलावे यांच्या रूपाने एक आश्वासक आणि फ्रेश चेहरा मतदारांना पाहायला मिळणार आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असलेल्या आणि नेहमीच (अपवाद सोडल्यास) भाजपचे वर्चस्व असलेल्या बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण आहे.

सद्यस्थितीत या प्रभागात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसत आहे. येत्या काही दिवसांत येथील चित्र स्पष्ट होणार आहे. या प्रभागात युवा आणि आश्वासक चेहरा म्हणून रत्नाकर आगलावे (B. Com, GDC&A, Krushi padvika) यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात निमजगा, गडगेवाडी, गवळीटेंब, शेटकरवाडी हा भाग येतो.

रत्नाकर आगलावे यांच्या रूपाने एक उच्च शिक्षित तरुण दमाचा उमेदवार मतदारांसमोर येणार आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत असल्याने त्यानंतर येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सद्यस्थितीत रत्नाकर आगलावे यांचे नाव आघाडीवर आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा