You are currently viewing कुडाळ खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ६१ अर्ज दाखल

कुडाळ खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ६१ अर्ज दाखल

१८ डिसेंबर रोजी होणार निवडणूक

कुडाळ

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (ता. १८ नोव्हेंबर) ६१ अर्ज दाखल झाले तर ७७ अर्ज विक्री गेले आहेत. या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार की गेल्या वर्षी प्रमाणे बिनविरोध केली जाणार हे २२ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. तसेच या निवडणुकीमध्ये रती महारती सुद्धा रिंगणात उतरले आहेत.


कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी होणार असून या निवडणुक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शुक्रवार १८ नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती आज शेवटच्या दिवशी ७७ अर्ज विक्रीला गेले तर ६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे यामध्ये रती महारथी रिंगणात उतरले आहेत त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी होणार तसेच बिनविरोध करण्यासाठी कोण पुढाकार घेणार हे २२ नोव्हेंबर पर्यंत समजणार आहे या निवडणुकीमध्ये २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर हा कालावधी अर्ज मागे घेण्याचा असून या मुदतीत निवडणूक होणार की नाही हे ठरणार आहे तसेच ७ डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी व त्यांना चिन्ह वाटप केले जाणार आहे आणि १८ डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. उमेदवारी दाखल झालेल्या ६१ अर्जांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट यांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे तसेच काही अपक्ष देखील आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा