You are currently viewing लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा किसान मोर्चाचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उमेदवाराचा प्रचार करणार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा किसान मोर्चाचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उमेदवाराचा प्रचार करणार

*लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा किसान मोर्चाचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उमेदवाराचा प्रचार करणार* .

*उमेश सावंत , जिल्हाध्यक्ष – किसान मोर्चा , सिंधुदुर्ग* .

सिंधुदुर्ग

आज दि. २९/०३/२०२४ रोजी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा किसान मोर्चा ची जिल्हा बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकरजी सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने किसान मोर्चा ने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने शेतकरी बांधवांना दिलेल्या योजनांची माहीती द्यावी ,असे मार्गदर्शन केले .
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा किसान मोर्चाचा सक्रिय सहभाग असणार असल्याचे सांगीतले . तसेच जिल्ह्याची ११ जणांची प्रचार कमिटी , तसेच प्रत्येक तालुक्याची किमान १० जणांची प्रचार कमिटी तयार करणार असल्याचे सांगितले . तसेच येत्या चार दिवसात आठही तालुक्याच्या किसान मोर्चाच्या तालुका कार्यकारणीच्या बैठका आयोजित करुन प्रचार यंत्रणेची माहीती देण्यात येणार असल्याचे सांगीतले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील व महेश संसारे , प्रदेश सदस्य प्रफुल्ल प्रभु ,माजी जिल्हाध्यक्ष अमृत चौगुले , उपाध्यक्ष विजय रेडकर , महादेव सावंत,उपाध्यक्ष कीर्तीमगल भगत व दीपा काळे , सोशल मिडीयाचे अंकित आजगावकर , प्रसाद भोजने , सखाराम परब , मोहन जाधव , सुर्यकांत नाईक ,ॲग्री काॅस्टचे प्रकाश झंडे , शंकर गुरव , दामोदर नारकर , संदिप देसाई , नारायण शुंगारे इत्यादी उपस्थित होते .
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश संसारे यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 4 =