You are currently viewing शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे गरजेचे – सुनील राऊळ

शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे गरजेचे – सुनील राऊळ

सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने खरेदी विक्री निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार..

सावंतवाडी

पन्नास वर्षाहून अधिक काळ सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ करत आहे, ह्या खरेदी विक्री संघामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन तंत्रज्ञान कसं आणण्यात येईल या दृष्टीने नवीन संचालक मंडळाने प्रयत्न करावेत आजच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये ही जुनी संस्थेलाही एक नवी झळाकी मिळणे आवश्यक आहे. असे मत सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे महा व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी व्यक्त केले.

सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने सत्कार व गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सह्याद्री फाउंडेशनचे संचालक माजी सभापती प्रमोद सावंत व कंइमर्स सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद गावडे हे दोघेही खरेदी विक्री संघावर निवडून आले आहेत त्याबद्दल त्यांचा गौरव सत्कार श्री राऊळ व माजी नगराध्यक्ष व सह्याद्री फाउंडेशन चे माजी अध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद तावडे सचिव सुहास सावंत माजी सचिव एडवोकेट संतोष सावंत माजी अध्यक्ष विजय चव्हाण शशिकांत मोरजकर मोहिनी मडगावकर राजन राऊळ अशोक सांगेलकर अजय गोंदाव ळे दीनानाथ नाईक सत्यवान बांदेकर हेमंत बांदेकर अमित परब आबा केळुसकर योगेश शेटये समीर पालव आधी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा