सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशाने सकल भारत अभियांनांतर्गत कायदेविषयक जनजागृती व नागरिकांचे सक्षमीकरण करणे करीता कायदेविषयक जनजागृती व विधी सेवा सप्ताह दिनांक ३१/१०/२०२२ ते १३/११/२०२२ च्या निमित्ताने दिनांक १३/११/२०२२ रोजी ओरोस – सिंधुदुर्ग येथे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज सावंतवाडी प्रशालेची इयत्ता 06 वीची कु. तन्वी प्रसाद दळवी हिने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज सावंतवाडी प्रशालेचे नावलौकिक उज्ज्वल करणाऱ्या या कामगिरीबद्दल कु. तन्वी प्रसाद दळवी व सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगांवकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.