वेदना
मी कधी न कुरवाळल्या,
वेदना माझ्या दुःखाच्या…
हसत हसतच दुःखही
घोट घोट पीत गेलो.
अमृतासम भासल्या तेव्हा,
मला माझ्याच वेदना..
क्षणा क्षणाला काळजात,
एक एक घोट रिजवत गेलो.
कधी न बुजवल्या जखमा,
खोलवर झालेल्या घावाच्या.
भळाभळा वाहणारं रक्तही,
उघड्या डोळ्यांनी पाहत आलो.
कधी न केला विचार मी,
स्वतःच्या सुखाचा अपार.
सुख दुःख दोन्हीही मला,
एक समानच मानत आलो.
नको पुन्हा त्या नव्याने,
आठवणी जुन्याच विरहाच्या,
विरह हाच जीवनातील सजा,
कालकोठडी त्यालाच समजत आलो.
(दीपी)
दीपक पटेकर
📞८४४६७४३१९६