You are currently viewing राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत तळेरे नं.१ शाळेचे नेत्रदिपक यश

राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत तळेरे नं.१ शाळेचे नेत्रदिपक यश

राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत तळेरे नं.१ शाळेचे नेत्रदिपक यश

सहभागी विद्यार्थ्यांना १७ सुवर्ण, ४रौप्य, तर ५ कास्यपदके

कणकवली

रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध चित्रकला स्पर्धेत कणकवली तालुक्यातील जि. प. आदर्श प्राथ. शाळा तळेरे नं.१ च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना १७ सुवर्ण, ४ रौप्य व ५ कास्य पदके प्राप्त झाली आहेत. तर कु.अर्णव शैलेश सुर्वे हा विद्यार्थी तब्बल ३ सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्षा सिद्धी साटम, माजी अध्यक्ष व शिक्षणप्रेमी सदस्य शशांक तळेकर व सर्व सदस्य, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मजा करंदीकर व सर्व शिक्षकवृंद यांनी हार्दिक अभिनंदन करून कौतुक केले.

सदर चित्रकला स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक श्री. सत्यवान शांताराम चव्हाण गुरुजींचे विशेष मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + nineteen =