तोंडवली- बावशी गावात शिवसेनेला भगदाड…

तोंडवली- बावशी गावात शिवसेनेला भगदाड…

.आनितेश राणे यांच्या उपस्थितीत शेकडोचा प्रवेश,सत्ताधारी शिवसेनेला धक्का…

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मिळाली ताकद;

कणकवली
तोंडवली- बावशी गावात शिवसेनेला भगदाड पडले आहे.शेकडो शिवसैनिक,राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहे.तोंडवली बावशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मिळाली ताकद आहे. आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्यामुळे सत्ताधारी जोरदार शिवसेनेला धक्का बसला आहे.
यावेळी जि. प.सदस्य संजय देसाई, तालुकाध्यक्ष राजन चिके,सरचिटणीस पंढरी वायगणकर, महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, माजी सरपंच अंनत बोभाटे, भाई मोरजकर, श्री. मिराशी आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीच्या तोंडवली बवशी गावातील देवेंद्र बोभाटे, योगेश सदडेकर, दादा सदडेकर,  रवींद्र बोभाटे, सुनील बोभाटे, सुनील मोरये, सुनील सुतार, मंगेश बोभाटे, संतोष बोभाटे,  संतोष मोरये, सुनील साळुंखे, नागेश बोभाटे, प्रतीक सदडेकर, आर्यन मोरजकर, समीर भाट, विघ्नेश साळुंखे, बाळा बोभाटे, मधुकर बोभाटे गंगाराम बोभाटे, गौरवी बोभाटे,  शोभा बोभाटे, मानशी बोभाटे, सुनीता बोभाटे, मारुती शिरसाट, रुपेश कांडर, सतीश साळसकर, लक्ष्मण धुमाळ, सिताराम धुमाळ लावू कदम, राहुल कदम, राकेश कदम, अंकुश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा