You are currently viewing न्यूझीलंडमधील पंतप्रधान निवडणुकीत जसिंडा आर्ड्रन दुस-यांदा विजयी!!!!

न्यूझीलंडमधील पंतप्रधान निवडणुकीत जसिंडा आर्ड्रन दुस-यांदा विजयी!!!!

ऑकलंड :

 

न्यूझीलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान जसिंडा आर्ड्रन दुस-यांदा विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत त्यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. करोना संसर्ग रोखण्यात मिळवलेले यश हे आर्ड्रन यांच्या विजयाचे प्रमुख कारण मानले जाते.

निवडणुकीत पराभव झाल्यास पक्षनेतेपदाचा त्याग करण्याची घोषणा जसिंडा आर्ड्रन यांनी केली होती, पण त्यांच्या मजूर पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. आर्ड्रन यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाला ४९ टक्के मते मिळाली, त्यांचा मित्रपक्ष- ग्रीन पार्टीला ७.६ टक्के, तर मुख्य प्रतिस्पर्धी पुराणमतवादी नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळाली.

मजूर पक्षाने संसदेत बहुमत मिळवले आहे. न्यूझीलंडने प्रमाणात्मक मतदान प्रणाली स्वीकारल्यानंतर २४ वर्षांत असे स्पष्ट बहुमत कधीच एका पक्षाला मिळाले नव्हते. पूर्वी राजकीय आघाडया तयार करणे भाग पडत असे, पण यावेळी आर्ड्रन यांच्या मजूर पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा