संवाद मिडिया वेबसाईटचा आज शुभारंभ….

संवाद मिडिया वेबसाईटचा आज शुभारंभ….

जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते……

एका क्लिकवर वाचता येणार संवाद मिडियाच्या बातम्या…..

जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या शुभ हस्ते आज दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी ३.३० वाजता संवाद मिडिया वेब साईटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी संवाद मीडिया विषयी असलेल त्यांच मत व्यक्त केल. यावेळी संवाद मीडियाची पूर्ण टिम उपस्थित होती.

“मीडिया…. म्हटल की
प्रिंट मीडिया असो वा सोशल मीडिया.. तुमच्या आमच्या सर्वांसमोर समाजातील विविध गोष्टी, बातम्या, लेख, अनेक कथा, कल्पना, काव्य, स्थळविशेष, वक्तीविशेष, प्रवासवर्णन वा खाद्यभ्रमंती एक ना अनेक विषय आणून उभे करतात.
सोशल मिडियावर तात्काळ एका क्लिक वर क्षणाक्षणांची माहिती उपलब्ध होते. त्यामुळेच लोक जास्त आकर्षिले गेलेत ते सोशल मिडियाकडे…
संवाद मीडियाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण शैलीमुळे वाचकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.”, असे पत्रकार लोंढे संवाद मिडियाशी बोलताना म्हणाले.

संवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते. असे बोलत त्यांनी संवाद मिडियाला शुभेच्छा देत संवाद मिडियाच कौतुक केल.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा