बांदा
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बांदा नं.१ केंद्र शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आनंददायी बनला.
उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेत बालदिनी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांची वेशभूषा परिधान केली होती. या दिवशी श्रेया परब ,आयुष बांदेकर, समर्थ नार्वेकर,सर्वज्ञ वराडकर, समर्थ पाटील, हेमांगी दाभोळकर,काव्या चव्हाण,दुर्वा नाटेकर,काव्या पालकर, काव्या सावंत, तेजस्विनी गुरव, श्रीधर कुंडव, रमेश कोचरेकर,दुर्वांक मांजरेकर, एंजल आल्मेडा निधी मंजिलकर,आर्या शिंगडे,आदि विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला.
यावेळी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच विविध बालगीतांचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करून घेण्यात आले.
या दिवशी दुपारच्या सत्रात दिप्ती महाले, वृषाली सावंत,नेहा गवस, संयोनी हळदणकर आदि पालकांच्या मदतीने शाळेतील विद्यार्थीनींच्या हातावर मेहंदी रेखाटन करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ घेण्यात आले.
यादिवशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शिक्षिका सरोज नाईक,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी, रंगनाथ परब, जे.डी.पाटील, प्रशांत पवार ,गोपाळ साबळे, प्राजक्ता पाटील,शितल गवस यांनी परिश्रम घेतले.