You are currently viewing अनिल सरमळकर नावाचे वैचारीक, क्रिएटीव वादळ आता युरोपीय विद्यापीठातही घोंघावत पोहोचले आहे.– जॉन ब्रेट ( ब्रिटन )

अनिल सरमळकर नावाचे वैचारीक, क्रिएटीव वादळ आता युरोपीय विद्यापीठातही घोंघावत पोहोचले आहे.– जॉन ब्रेट ( ब्रिटन )

संवादाची संकुचित होत गेलेली भारतीय सध्यस्थितीतील अवस्था आणि प्रस्थापित आणि विस्थापित समुहानेही हितसंबधी कळप संस्कृतीमुळे खरोखरीचे मुक्त विचार आणि चिंतन यापासून काढलेला पळ तसेच अनिल म्हणतो तसे त्याची जाणीवपूर्वक केलेली कोंडी हे सत्य असल्यास अनिलने ही कोंडी फोडुन शेवटी सृजनशीलतेची ताकद काय असते हे दाखवून दिले असुन अनिल नावाचे हे वादळ आता भारतीय विचार साहित्य क्षेत्रातच नव्हे तर ते प्रतिष्ठित जागतिक युरोपीय विद्यापीठातही ते येवून ठेपले आहे. केवळ तरूण वयातच वैश्विक स्तरावर अनिल यांच्या मुक्त नव्या आश्वासक आणि आवश्यक अशा लेखन समीक्षा आणि विचारांची चर्चा होत आहे हे एक प्रकारे अविश्वसनीय वाटावे असे आहे असा अभिप्राय अनिल सरमळकर यांच्या लेखन आणि विचाराबद्दल एका इंग्रजी न्यूज साईटशी बोलताना इंग्लंड येथील ज्येष्ठ कल्चरल थियरीस्ट ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत जॉन ब्रेट यांनी व्यक्त केला आहे.

भारतीयच नव्हे तर एकूणच जगातील साहित्य कला तत्वज्ञान आणि शासनयंत्रणा यांना सांस्कृतिक मर्यादा आली असुन संपूर्ण व्यवस्थेचे सांस्कृतिक सूक्ष्म वाचन आणि विरचना होण्याची सुरुवात होणे महत्वाचे आहे तसे न झाल्यास जग राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधांतर काळोख्या अवस्थेत जाईल आणि जग शिक्षित पण मुल्यहीन रानटी आणि स्क्रिझोफेनिक अशा अवस्थेत प्रवेश करेल आणि हा काळ मध्ययुगातील अंधार युगापेक्षा अधिक भयकारी असेल असे स्फोटक विचार अनिल आज मांडत आहेत त्याकडे बघता बघता मोठमोठ्या विद्यापीठांचे लक्ष गेले आहे.

केवळ असंख्य अस्मिता समाज समूह जन जाती वंश जगभर आपापल्या अस्मिता आक्रमक करत असताना जगभर मानवामधे आपापसात भेद तणाव आणि वैर निर्माण होत असताना अनिल सरमळकर सारखा भारतातील अत्यंत छोट्या खेड्यातुन आलेला लेखक कवी नाटककार असे संपूर्ण मानवी समाजाचे चिंतन करत आहे ही काळाची गरज आहेच मात्र तेवढीच अत्यंत अपृप वाटावी अशी गोस्ट आहे. तसेच अनिल हे काही ॲकॅडमीक विचारवंत नाहीत किवा ते मांडत असलेले विचार क्लिष्ट आणि पांडित्याचे दर्शन दाखवणारे नसुन अनिल आपल्या कविता दिर्घ कवीता कादंबरी समीक्षा वैचारीक लेखन नाटक इत्यादीमधुन सहज पणे ते सांगत असुन त्यांचा व्यासंग प्रचंड मोठा आहेच आणि तो आवाक करणारा आहे असेही ब्रेट म्हणाले.

अनिल यांचे The fox हे अद्भुत नाटक केवळ नाटक म्हणुन पाहिले तर त्या लेखनावर अन्याय होवु शकतो. मात्र त्या नाटकातील भाषा त्यातील रंग ,अवकाश, प्रकाश योजना,नेपथ्य,वेषभूषा ध्वनी आणि संगीत या प्रत्येक घटाकात कुणीही यापूर्वी न केलेले प्रायोगिक अंश आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या नाटकातील जे विश्व साहित्याचे संदर्भ दडलेले आहेत ते उत्तुंग आहेत त्या अर्थाने अनिल यांनी हे महाशोकनाट्य लिहितांना नकळतपणे एक महाकाव्यच रचले आहे जणु.
याहुन मला सर्वात महत्त्वाचे वाटले ते म्हणजे भारतीयच नव्हे संपूर्ण जगातील रंगभूमीला या नाटकाने आव्हान दिले आहे
हे नाटक वाचताना छाती दडपून जाते असे भयंकर नाट्य अनिल यांनी रचले आहेच पण जगातील कोणताही दिग्दर्शक किवा अभिनेता हे नाटक करण्याचे धारिष्ट्य करेल का ? तसे केले तर मी नक्कीच त्या दिग्दर्शक अभिनेत्याला पाहायला जाइन त्याची दाद देण्यासाठी असेही जॉन ब्रेट बोलताना म्हणाले.

साहित्य समीक्षा कला संगीत रंगभूमी तत्वज्ञान संगीत शिल्पकला चित्रकला चित्रपट इत्यादी क्षेत्रातील त्यांचा व्यासंग त्यांच्या वयाच्या तुलनेत प्रचंड दिपवुन टाकणारा आहे.

भारतीय सांस्कृतिकता आणि युरोपियन सांस्कृतिक साम्राज्यवादाचे त्यानी परखड विवेचन विश्लेषण केलेच आहे आणि त्याचे सूक्ष्म वाचन करुन त्याची विरचनाही त्यांनी केली आहे परंतु नव्या पर्यायी विचारांचे सुध्दा अंश त्यांचा लेखनात असुन उत्तर आधुनिक युरोपीय तत्वज्ञ आणि विचारवंत मिशेल फुको रोला बार्थ
ल्योटार्ड एड्वर्ड सैद आणि जॅक देरिदा यांच्या तत्वज्ञान आणि कला समिक्षेचा अनिल यांच्यावर प्रभाव आहे.
तसेच त्यांनी आता चित्रपट दिग्दर्शनाच्याही क्षेत्रात प्रवेश केला असुन खर्या अर्थाने अत्यंत वादळी नाटककार असलेल्या अनिल यांच्या कविताही साहित्याच्या दृष्टीने तेवढ्याच शक्तिशाली आणि महत्वाच्या आहेत. पूर्ण जगाच्या सांस्कृतिक पटलावर एका खेड्यातून आलेले हे वादळ भारतीय साहित्य वर्तुळात बरीच पडझड ते करेलच पण हे वादळ आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतही शिरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा