गावच्या वेशीबाहेर राहूट्या उभारण्यात रमले चिंदर ग्रामस्थ
मालवण
चिंदर गावपळणीला केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने गावच्या वेशीबाहेर राहूट्या उभारण्यात चिंदर ग्रामस्थ रमले आहेत.चिंदर गावची गावपळण शुक्रवार अठरा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.तीन दिवस तीन रात्री गावाबाहेर आपले घरदार सोडून रानावनात गुराढोरांसहराहणारया ग्रामस्थांनी निवासस्थानासाठी राहूट्या उभारण्यास सुरुवात केली आहे.
जमिन सारवून स्वच्छ केली जात आहे. घरात असणारया विभागासारखेच विभाग बनविले जात आहे. बैठकीचा भाग,जेवण बनविण्यासाठी वेगळा भाग बनविले जात आहेत. यासाठी चिव्याच्या काठ्यांचा वापर करुन राहूट्या उभारण्यास वेग आला आहे.याबाबत माहिती देताना चिंदर तेरई ग्रामस्थ मिथून माळगांवकर सांगतात सर्व ग्रामस्थ आम्ही मिळून मिसळून तीन दिवस तीन रात्री खेळ खेळत,गप्पा मारत धम्माल ,मज्जा करत घालवतो.