कणकवलीत गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

कणकवलीत गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

कणकवली

कणकवली शहरात नगरपंचायत च्या वतीने सुसज्ज गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या उभारणीचे भूमिपूजन आज रविवारी माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे, सौ. निलमताई राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे, यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
परमपूज्य भालचंद्र महाराज मठा शेजारी कांबळी गल्ली येथे एकूण 74 गुंठे क्षेत्रात हा प्रकल्प होणार असून सुमारे 15 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी साडेचार कोटीचे पहिल्या टप्प्यात काम होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला भाजपाचे तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, राजश्री धुमाळे, रोटरी अध्यक्ष निशा अंधारी, दादा कुडतरकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा