You are currently viewing वीज वितरणवर व्यापारी संघ नाराज ; सहकार्य करीत नसल्याचा अध्यक्ष मांजरेकर यांचा आरोप

वीज वितरणवर व्यापारी संघ नाराज ; सहकार्य करीत नसल्याचा अध्यक्ष मांजरेकर यांचा आरोप

सावंतवाडी

येथील महावितरण तर्फे विज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला व्यापारी संघ पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले असताना देखील वीज वितरण कडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. आम्ही त्यांना विविध सूचना देखील केल्यात मात्र तरी देखील त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचे दखल घेतली नाही अशी नाराजी व्यापारी संघाचे सावंतवाडी अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी आज केली.

दरम्यान विज ग्राहक मेळाव्याचे या आदी आयोजन केले नव्हत. आम्ही व्यापारी संघटना हा मेळावा घेण्यास भाग पाडले असताना देखील आता ते कोणतेही सहकार्य करत नसल्याचे ते म्हणाले. मांजरेकर आज आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

या विज ग्राहक मेळ्याला मोठ्या संख्येने ग्राहकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =