You are currently viewing मालवणी भाषेला उच्च स्तरावर नेण्यासाठी केरळ मधील उद्योजकाने प्रोत्साहन देत बनवला लघुपट….

मालवणी भाषेला उच्च स्तरावर नेण्यासाठी केरळ मधील उद्योजकाने प्रोत्साहन देत बनवला लघुपट….

कांतरा नंतर मालवणी भाषेत बनवलेली एक थरारक कहाणी…..

मालवणी भाषा ही संपूर्ण कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, आता तर मराठी चित्रपटांमध्ये देखील मालवणी भाषेचा उल्लेख केला जातो अनेकदा परप्रांतीय लोक देखील मालवणी भाषा शिकण्यासाठी उत्सुक असतात आणि मनात एक प्रकारची आवड निर्माण करत ते मालवणी भाषा अतिशय कमी कालावधीत शिकतात अशी ही मालवणी भाषा प्रेमळ असल्याने अतिशय जलद गतीने लोकप्रिय ठरली आहे.
तर मालवणी भाषा अतिशय जलद गतीने लोकप्रीय बनवण्यासाठी युटूबवर लघुपट बनणाऱ्या कोकण मधील युवकांचा देखील मोठा सहभाग आहे याचंमुळे ही मालवणी भाषा पर्यटक व व्यवसाया निमित्त आलेल्या परप्रांतीयांच्या देखील मनपसंतीस आली आहे.


याचंच एक उदाहरण म्हणजे दोडामार्ग मधील स्वामी प्रोडक्शन चे सर्वेसर्वा करण शेटकर आणि विकास तर्पे हे गेली अनेक वर्षे युटूब चॅनल चालवत आहेत स्वामी प्रोडक्शन असा हा युटूब चॅनल करण शेटकर आणि विकास तर्पे असे दोडामार्ग मधील दोन युवक अतिशय जिद्दीने कोणत्याही आर्थिक बाजूची अपेक्षा नकरता युटूब चॅनल चालवत आहेत आणि आपली मालवणी भाषा पुढे नेण्याचे काम करत आहेत.


मालवणी भाषा ही गोडवा निर्माण करत गरिबीत देखील सुखी आणि निस्वार्थी जीवन जगण्यास शिकवते हे लक्षात घेत केरळ मधील अमोल देसाई ह्या उद्योकाने करण शेटकर आणि विकास तर्पे यांच्याशी संपर्क साधत मालवणी भाषेत कोकण वर आधारित लघुपट बनवण्यास सांगत काही प्रमाणात मदत स्वरुपात आर्थिक मदत देखील केली असता करण शेटकर आणि विकास तर्पे यांच्या स्वामी प्रोडक्शन निर्मित लपंडाव (एक रहस्यमय कथा..)हा लघुपट काही दिवसात स्वामी प्रोडक्शन या युटूब चॅनलवर प्रदर्शित होत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, यात महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रसिद्ध असलेले आपल्या दोडामार्ग तालुक्यातील कलाकार करण शेटकर आणि विकास तर्पे यांच्या प्रयत्नातून स्वामी प्रोडक्शन आणि अमोल देसाई निर्मित “लपंडाव”( एक रहस्यमय कथा)आपल्या बोली भाषेपासून थरारक अशी ही कथा आहे, नवीन काहीतरी बनवायचा प्रयत्न असून या कथेचं लेखन आणि संवाद विकास तर्पे यांनी केले आहे तर या कथेचे दिग्दर्शन करण शेटकर यांनी केल आहे, याचे संपूर्ण चित्रीकरण बोडदे या गावातील रामदास गवस यांच्या घरी झालेले असून या कथेचे निर्माते केरळमधील उद्योजक अमोल देसाई हे आहेत मुख्यतः अमोल देसाई हे केरळमधील असून त्यांना मालवणी भाषेबद्दल निर्माण झालेला गोडवा लक्षात घेता ही कथा बनवण्याचा आग्रह अमोल देसाई यांचा होता तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम स्वामी प्रोडक्शन वर येणार असल्याचे स्वामी प्रोडक्शन चे सर्वेसर्वा विकास तर्पे आणि करण शेटकर यांनी सांगितले आहे,तर यामध्ये अनेक कलाकारांची देखील साथ लाभली असून रात्रीस खेळ चाले फेम चंद्रहास राऊळ, स्वामी समर्थ सिरीयल प्रतिभा चव्हाण, स्वामी समर्थ फेम सौरभ माळवदे, मिमिक्री आर्टिस्ट अरुण गोंधळकर,स्पृहा दळवी यांसह अनेक सहकारी देखील आहेत बाळकृष्ण जाधव,राजेश नाईक,आत्माराम जाधव,सिद्धेश नाईक,ललित परब,मधुकर शेटकर,निकेश नाईक,तर ही कथा आणि मालवणी भाषा उच्चांग स्तरावर नेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या युवा पत्रकारांचा देखील मोठा सहभाग आहे. त्यात प्रशांत गवस तर गोविंद शिरसाट आदींचे सहकार्य लाभले आहे.
तर एका केरलीयन व्यक्तीच्या मनात मालवणी भाषा कशा प्रकारे घर करु शकते हे ह्या स्वामी प्रोडक्शन युटूब चॅनलच्या माध्यमातून समजले आहे येणारा लघुपट पाहण्यासाठी चॅनला सबस्क्राईब करावे आणि मालवणी भाषेला उच्च स्तरावर नेण्यासाठी मदत करावी अशी विनंती स्वामी प्रोडक्शन या युटूब चॅनलचे सर्वेसर्वा करण शेटकर व विकास तर्पे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा